महापारीनिर्वान दिन व स्मारकासाठी वेगळा निधी उभारावा - मनोज संसारे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2012

महापारीनिर्वान दिन व स्मारकासाठी वेगळा निधी उभारावा - मनोज संसारे


मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिकेकडून गणेशोत्सव व महापारीनिर्वान दिन या मध्ये भेदभाव होत असून गणेशोत्सवावर जास्त निधी खर्च केला जात असल्याने महापारीनिर्वान दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी वेगळा हेड बनवून निधीची तरतूद करावी अशी मागणी अपक्षांचे गटनेते मनोज संसारे यांनी पालिका सभागृहामध्ये केली.  
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याचे काँग्रेसकडून जाहीर झाले. यावर विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी मंगळवारी निवेदन केले; या निवेदनात ही जागा देण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीच प्रयत्न केले, असे भासवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना सर्वच पक्षांनी बाबासाहेबांकडे दुर्लक्ष केल्याने स्मारक अद्याप उभे राहू शकले नाही असे संसारे म्हणाले. पालिकेप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही महापारीनिर्वान दिना साठी निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन संसारे यांनी केले. पालिका सभागृहाने इंदू मिलमधील स्मारकामध्ये बाबासाहेबांचा १०० फुटांचा पुतळा उभारावा असा ठराव पास करून राज्य सरकारकडे पाठवावा अशी सूचना संसारे यांनी केली 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS