परेचा १५0 वर्षांचा प्रवास प्रदर्शनातून - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2013

परेचा १५0 वर्षांचा प्रवास प्रदर्शनातून




मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : पश्‍चिम रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे गाडी १५0 वर्षांपूर्वी धावली होती. त्यानिमित्ताने पश्‍चिम रेल्वेने चर्चगेट स्थानकावर एक प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनात आतापर्यंतच्या अनेक रेल्वे गाड्यांची मॉडेल्स ठेवण्यात आली आहेत. गुरुवारी सकाळी सुरू झालेल्या या प्रदर्शनाला मुंबईकरांनीही चांगली उपस्थिती दर्शवली आहे.

पश्‍चिम रेल्वे मार्गावर पहिली गाडी २८ नोव्हेंबर १८६४ मध्ये दाखल झाली. या १५0 वर्षांच्या प्रवासाची आपल्या प्रवाशांना माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी परेचे महाव्यवस्थापक हेमंत कुमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात १५0 वर्षांतील पश्‍चिम रेल्वेत झालेले बदल फोटोरूपी मांडण्यात आले आहेत. परे मार्गावरील सर्वात जुने रेल्वे स्थानक ग्रॅण्ट रोड असल्याचे अनेक प्रवाशांना या प्रदर्शनामुळे समजत आहे.पश्‍चिम रेल्वे मार्गावर दररोज १ हजार ३0५ लोकल फेर्‍यांमधून ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. तरीही लोकलला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे येणार्‍या काळात परेवर १८ डब्यांची लोकल चालवण्याचा परेचा विचार आहे. तसेच याच मार्गावर पहिली एसी लोकलही धावणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS