मोनोरेलच्या तिकीट दरात कपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2013

मोनोरेलच्या तिकीट दरात कपात

 मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : दक्षिण मुंबईतील अरुंद रस्त्यांवरून धावताना सार्वजनिक रस्ते वाहतुकीचा भार कमी करणार्‍या मोनोरेल प्रकल्पासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या वडाळा-चेंबूर या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेवरून मोनोरेल धावताना दिसणार आहे. 

वडाळा-चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या पहिल्या मोनोरेल मार्गिकेच्या बांधकामाच्या सुरुवातीलाच म्हणजेच फेब्रुवारी २00९ मध्ये मोनोरेलचे कमीत कमी तिकीट ८ रुपये व जास्तीत जास्त तिकीट २0 रुपये ठरविण्यात आले होते. मात्र बुधवारी मोनोरेलचे कमीत कमी तिकीट ५ रूपये व जास्तीत जास्त १९ रुपये अंतिम करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुख्यमंत्र्यांनी मोनोरेलच्या तिकीट दराबाबतचा अंतिम निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकल्प सुरू असतानाच एमएमआरडीएकडून मोनोरेलचे तिकीट हे बेस्टच्या तिकिटाच्या दीडपट असणार असल्याचे सांगण्यात आले होते. म्हणजेच जर बेस्ट बसचे कमीत कमी तिकीट ६ रुपये असेल तर मोनोरेलचे तिकीट ९ रुपये असण्याचा अंदाज होता. लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे तिकीट दरही १0 टक्के वाढण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले होते. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच अंदाजे असणार्‍या प्रकल्पाची किंमत वाढल्याचे आणि त्याचा परिणाम तिकीट अथवा टोल वसुलीवर होतानाचे उदाहरण असतानाच मोनोरेलचे तिकीट दर कमी झाल्याची गोष्ट आश्‍चर्य वाटणारी आहे. आगामी काळातील निवडणुका यामुळे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९ किमीच्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मार्गिकेपैकी ८.८ किमीच्या वडाळा ते चेंबूर या पहिल्या टप्प्यातील मोनोरेलचे तिकीट दर हे ५ ते ११ रुपयांच्या आसपास असणार आहेत, तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसर्‍या टप्प्यासाठी ते दर जास्तीत जास्त १९ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
बदललेले तिकीट दर
किमी / तिकीट दर रुपये
0 - ३ / ५ रुपये
३- ५ / ७ 
५ - ७ / ९ 
७ - १0 / ११
१0- १५ / १४
१५ - २0 / १५
२0 /१९

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS