मुंबई : काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्या ज्योत्स्ना दिघे यांनी सोमवारी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांना सादर केला. त्यामुळे पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झालेल्या देवेंद्र (बाळा) आंबेरकर यांचा स्थायी समितीवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र आंबेरकर यांची विरोधी पक्षनेतेपदी, तर संदीप देशपांडे यांची मनसेच्या गटनेतेपदी नियुक्ती झाल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घोषित केले. मात्र या दोघांनाही स्थायी समितीचे सदस्यत्व देण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने याबाबत संशयाचे वातावरण होते, मात्र काँग्रेसच्या नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचा सोमवारी राजीनामा दिला. त्यामुळे आंबेरकर यांना स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. आंबेरकर हे सुधार समितीत सदस्य होते. त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा सोमवारी सुधार समीतीचे अध्यक्ष डॉ. राम बारोट यांना सादर केला. दरम्यान, ज्योत्स्ना दिघे यांची नियुक्ती सुधार समितीच्या सदस्यपदी होणार आहे. या समित्यांवर या दोघांच्या नावांची घोषणा महापौरांनी सभागृहात केल्यानंतर ते या समितीच्या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत.
Post Top Ad
19 November 2013
Home
Unlabelled
देवेंद्र आंबेरकर यांना स्थायी समितीचे सदस्यपद
देवेंद्र आंबेरकर यांना स्थायी समितीचे सदस्यपद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment