सीसीटीव्ही कॅमेर्यांसाठी एमएमआरडीएने निधी दिला
मुंबई : पूर्व मुक्त मार्गावर होणार्या अपघातांची संख्या पाहता आणि सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एमएमआरडीए सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. यामुळे अपघातांची संख्या कमी होऊ शकते.
एमएमआरडीने पूर्व मुक्त मार्ग उभारला आहे. हा मार्ग सिग्नलविरहित असल्यामुळे वाहनचालक सुसाट वेगाने वाहने चालवतात. दुचाकीस्वारांना या मार्गावर परवानगी नाही. मात्र तरीही दुचाकीस्वार मार्गावरून जात असल्याचे आढळून आले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यात मार्गावर अपघात झाले आहेत. मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास अपघातावर आळा घालता येऊ शकतो. सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यास वेगाने वाहन चालविणार्या चालकांवर नजर ठेवता येऊ शकते. तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणार्या चालकांना दंड ही ठोठावता येऊ शकतो. यामुळे मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या मागणीने जोर धरला होता. वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावानुसार एरिया ट्राफिक कंट्रोल योजनेतंर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.मुंबई महानगरपालिका मार्गावर सीसीटीव्ही बसवणार आहे. त्यासाठी एमएमआरडीए निधी उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीएने मुंबई महानगरपालिकेकडे पाठवला आहे. त्यामुळे मुंबई मनपाने सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे एमएमआरडीएने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


No comments:
Post a Comment