मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाइफ लाइन असलेल्या बेस्टची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने १ हजार ५४७ पदे कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदाचाही समावेश आहे. त्यामुळे विद्युत आणि परिवहन विभागातील अधिकार्यांना उपमहाव्यवस्थापक या पदावरच नवृत्त व्हावे लागणार आहे. बेस्ट प्रशासनाच्या उत्पन्नात घट, तर आस्थापना खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. अधिकारी आणि कर्मचार्यांना द्यावा लागणार्या अनेक भत्त्यांमुळे दरवर्षी सुमारे १ हजार ९00 कोटी रुपये खर्च केले जातात. यामध्ये परिवहन विभागाच्या आस्थापनाचा खर्च सुमारे १५00 कोटी रुपये आहे. २0१४-१५ मध्ये परिवहन विभागाचा आस्थापना खर्च १ हजार ५५९ कोटी, तर विद्युत विभागाचा ४१२ कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. त्यामुळे पदे रद्द करून आस्थापन खर्चात बचत करण्यात येणार आहे. रद्द करण्यात येणार्या पदांमध्ये अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदाचाही समावेश आहे. त्याशिवाय लिपिकांची २५, बसचालक ३८१, बसवाहक ३७९, शिपाई १५, सहाय्यक अभिंयता १६, उपअभियंता ३३, दुय्यम अभियंता ५0, प्रभारी अभियंता ४0, नवभणी ३१0 या पदांचा समावेश असणार आहे. दरम्यान, अतिरिक्त महाव्यवस्थापक पदापर्यंत बेस्टच्या अधिकार्यांची पदोन्नती व्हावी यासाठी हे पद रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केली आहे.Post Top Ad
29 November 2013
Home
Unlabelled
बेस्टमधील १ हजार ५४७ पदे रद्द होणार
बेस्टमधील १ हजार ५४७ पदे रद्द होणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment