पालिका शिक्षकांना नोव्हेंबर २0११ नंतरची थकबाकी मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2013

पालिका शिक्षकांना नोव्हेंबर २0११ नंतरची थकबाकी मिळणार

मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांना नोव्हेंबर २0११ ते मार्च २0१२ पर्यंतची थकबाकी पूर्वीप्रमाणेच परिगणना करून देण्याचे सामान्य प्रशासनाने मान्य केले असून त्याबाबतचा अंतिम प्रेाग्राम ठरविण्यासाठी 3 डिसेंबर रेाजी शिक्षण उपायुक्तांच्या दालनात शिक्षक सभेबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही त्थकबाकी मिळावी म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक सभेचे रमेश जोशी यांनी पालिका उपायुक्तांपासून आयुक्तांपर्यंत तगादा लावला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून उर्वरित थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS