मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
सरकारी कर्तव्ये पार पडताना होणार्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश लागू केला आहे. त्यानुसार एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारशी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेणार्या अधिकार्यांवर यापुढे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
रेशनकार्ड, जातीचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा जन्मदाखला म्हणा...आदी दस्तऐवजासाठी नागरिकांना आता वारंवार सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. सरकारकडून अशी कोणतीही कागदपत्रे आपल्याला आता एका ठरावीक मुदतीत दिली जाणार आहेत. एवढेच नव्हे तर एखाद्या सरकारी विभागात दिलेल्या पत्राला तसेच ई-मेललादेखील संंबंधित कार्यालयातून वेळेत पोच दिली जाणार आहे, अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांना चौकशी व कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी सनदया निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने सर्व कार्यालयांना नागरिकांसाठी सनद तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारकडून दिल्या जाणार्या सेवासुविधा जनतेपर्यंत वेळेत पोहोचल्या पाहिजेत, मात्र त्यासंदर्भात दिरंगाई करणार्यांबाबत तक्रार कशी करावी यासाठी ही सनद तयार करण्यात आली असून त्याकरिता विविध अर्ज तयार करण्यात आले आहेत. या अर्जाच्या माध्यमातून शासनाकडे सर्व वस्तुस्थिती द्यावी लागणार आहे.


No comments:
Post a Comment