मृतांच्या वारसांना लवकरच सेवेत सामावून घेण्याचे पालिकेचे आश्‍वासन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 November 2013

मृतांच्या वारसांना लवकरच सेवेत सामावून घेण्याचे पालिकेचे आश्‍वासन

मुंबई - 29 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई : डॉकयार्ड रोड येथील दुर्घटनाग्रस्तांची पालिकेकडून झालेल्या उपेक्षेबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने या दुर्घटनेतील जखमींवर पालिकेकडून मोफत उपचार करण्यात येतील तसेच मृतांच्या वारसांना लवकरच सेवेत सामावून घेण्यात येईल, असे गुरुवारी जाहीर केले.

डॉकयार्ड रोड येथील इमारत दुर्घटनेत ६१ जणांना जीव गमवावा लागला, तर यात २२ कुटुंबे बेघर झाली, मात्र मृतांच्या वारसांना पालिकेने अद्यापही सेवेत घेतले नसून या दुर्घटनाग्रस्तांची परवड सुरू असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले. याची गांभीर्याने दखल घेत अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी गुरुवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त माहिती दिली. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांपैकी ५३ जणांना आर्थिक मदत देण्याचे मनपाने जाहीर केले होते. त्यानुसार त्यांना १ कोटी २९ लाखांची आर्थिक मदत आतापर्यंत देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर मृतांपैकी पूजा पाटणकर, विजय जाधव व प्रमिला गायकवाड यांच्या वारसांना काही वादामुळे अद्यापही मदत देण्यात आलेली नाही. दुर्घटनाग्रस्तांची घाटकोपर येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांची जवळपास सोय करून या सातत्याने होणार्‍या मागणीनुसार भायखळा येथील सिम्प्लेक्स मिल येथील शिबिरात १९ कुटुंबांसाठी म्हाडाकडे २३.५0 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. या दुर्घटनेत मनपाचे १0 कामगार मरण पावले. त्यांच्या नातेवाईकांपैकी ५ जणांना सेवेत घेण्याबाबत निश्‍चित करण्यात आले आहे, तर दोघांचे प्रस्ताव फेरतपासणीसाठी आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहेत. तसेच एकाची शैक्षणिक पात्रता नसल्याने त्याला सेवेत सामावून घेण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS