पालिका अभियंत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2013

पालिका अभियंत्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार

मुंबई : पालिकेच्या एका सहाय्यक अभियंत्यावर काँग्रेसच्या एका कार्यकर्तींनी केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या अंधेरी येथील के-पूर्व विभाग कार्यालयातील अभियंत्यांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन केले. पालिकेने केलेली तक्रार खोटी असून, जोपर्यंत ती मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे या अभियंत्यांनी स्पष्ट केले. अंधेरी येथील काँग्रेसच्या एका कार्यकर्तीने सहाय्यक अभियंता यलप्पा गायकवाड यांच्याविरुद्ध गुरुवारी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे के-पूर्व विभाग कार्यालयातील अभियंते संतप्त झाले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात मोर्चा नेला होता. या प्रकारामुळे नाराज जालेल्या अभियंत्यांनी मुंबई म्युनिसिपल इंजिनीयर्स युनियन आणि इंजिनीयर्स असोसिएशन या संघटनांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी अभियंत्यांनी काम बंद आंदोलन केले. ही तक्रार खोटी असल्याचे सांगून पालिका अभियंत्यांना संरक्षण मिळावे, ही मागणी संघटनांनी लावून धरली. याबाबत आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS