आझाद मैदानात लहूजी शक्ती सेनेचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2013

आझाद मैदानात लहूजी शक्ती सेनेचे आंदोलन

मुंबई : मातंग समाजाला आरक्षण मिळावे या व इतर मागण्या घेऊन लहूजी शक्ती सेनेच्या वतीने शुक्रवारी आझाद मैदानात तीव्र आंदोलन करण्यात आले. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट न झाल्याने व इतर कुणाची भेट नको असल्याने हे आंदोलन आता ३१ डिसेंबरला तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी या वेळी दिला. अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळण्याकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी. अनुसूचित जातीतील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास व प्रगती होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याकरिता राज्य सरकारच्या समाजकल्याण, कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, फलोत्पादन आदी विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांमध्ये बिहार राज्याप्रमाणे अ,ब,क,ड नुसार वर्गवारी करून अनुसूचित जातीतील उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला व इतर जातींना सामाजिक न्याय द्यावा. अनेक क्रांतिवीरांचे व समाजसुधारकांचे गुरू आणि भारतीय सशस्त्र क्रांतीचे आद्यजनक क्रांतीपिता लहूजी वस्ताद यांचा पुतळा विधानभवनासमोर व भवनाजवळ बसविण्यात यावा. आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद यांच्या संगमवाडी, पुणे येथील राष्ट्रीय स्मारकासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS