लहूजी साळवे यांची जयंती उस्ताहात साजरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

लहूजी साळवे यांची जयंती उस्ताहात साजरी

 स्मारक उभारणार असल्याची आ. नवाब मलिक यांची घोषणा
रशिद इनामदार / मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
आद्य क्रांतीगुरू लहूजी साळवे जयंती उत्सव समितीच्या वतीने लहुजींची २१९ वी जयंती २४ नोव्हेंबर  रोजी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली . यावेळी सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मानखुर्द येथील लहूजी साळवे मैदानापर्यंत लहुजींच्या प्रतिमेची रथातून वाजतगाजतमिरवणूक काढण्यात आली . ब्रास बँड पथक ,लेझीम पथक आणि दांडपट्टा खेळणारे या मिरवणुकीत सामील झाले होते .  महिला पारंपारिक वेषात लेझीम खेळत यात सामील झाल्या होत्या . संध्याकाळी मिरवणुकीचा समारोप लहूजी उद्यानात झाला त्यानंतर जाहीर सभेचा कार्यक्रम झाला . या सभेत आ. नवाब मलिक यांनी लहूजी साळवे यांचे शासनातर्फे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले ,तसेच लहुजींच्या पुण्यातील संगमवाडी समाधी परिसराचा विकास केला  जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली . 
दुपारी सुमन नगर ते लहूजी उद्यानपर्यंत ही मिरवणूक संध्याकाळपर्यंत चालली . शाहीर रामलिंग जाधव यांनी लोक प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर केला . मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी लहूजी साळवे यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचं  आश्वासन दिलं . या कार्यक्रमाला बाबासाहेब गोपले ,  कुसुमताई गोपले , धनराज थोरात ,नामदेव साठे ,  रवींद्र पवार ,दादासाहेब साठे ,  विठ्ठल गडीकर , रमेश करडे , हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते . 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS