आंबेडकर स्मारकाच्या 'मास्टर प्लॅन'साठी दहा कंपन्या स्पर्धेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

आंबेडकर स्मारकाच्या 'मास्टर प्लॅन'साठी दहा कंपन्या स्पर्धेत

मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला असतानाच या स्मारकाचा प्रस्तावित आराखडा तयार करण्यासाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत स्मारकासाठी स्पर्धात्मक पद्धतीने सर्वोत्तम संकल्पित आराखड्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीसही दिले जाणार असल्याने स्पर्धेसाठी निवडलेल्या दहा देशी-परदेशी कंपन्यांत चांगलीच स्पर्धा रंगण्याची चिन्हे आहेत. 

हे स्मारक जागतिक स्तराचे करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. सुरवातीला स्मारकाचा सर्वोत्तम बृहत्‌ आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करून घेण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. 

एमएमआरडीएने स्मारकाचा बृहत्‌ आराखडा (मास्टर प्लॅन) तयार करण्यात स्वारस्य असलेल्या देश-परदेशातील कंपन्यांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार आठ भारतीय आणि पाच परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. त्यांच्या प्रस्तावांची एमएमआरडीएने नेमलेल्या वास्तुशास्त्रज्ञांच्या समितीने छाननी आणि मूल्यांकन केल्यानंतर दहा कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. आता या दहा कंपन्यांना दोन महिन्यांत संकल्पित बृहत्‌ आराखडा सादर करण्यास सांगितले जाणार आहे. त्यानंतर सर्व दहा संकल्पित बृहत्‌ आराखड्यांचे मूल्यांकन करून त्यातील सर्वोत्तम आराखड्याची निवड तज्ज्ञ समिती करेल. मग त्या विजेत्या कंपनीला पाच ते सहा महिन्यांत सविस्तर आराखडा करण्यास सांगितले जाणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांनी "सकाळ'ला दिली. 

'मास्टर प्लॅन'साठी स्पर्धेतील दहा कंपन्या - मेसर्स मुरालाज, मेसर्स सोमय्या अँड कलप्पा कन्सल्टंट्‌स, मेसर्स जेकॉब-मॅकफार्ल-ऍन, मेसर्स व्ही.एस.पी.बी. असोसिएट्‌स, मेसर्स लोकस, मेसर्स जैन अँड असोसिएट्‌स, मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएट्‌स, मेसर्स यू.डी.पी. इंटरनॅशनल (अर्बन डिझाइन अँड प्लॅनिंग कन्सल्टंट्‌स), मेसर्स जी.एम.पी. इंटरनॅशनल (मेसर्स ऍस्ट्युट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा. लि.) आणि मेसर्स ऍस्मिपटोट आर्किटेक्‍चर (मेसर्स स्कायलाइन आर्किटेक्‍ट्‌स).

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS