मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई - मुंबईत लवकरच मोफत सार्वजनिक वायफाय सुविधा देण्यात येईल, अशी माहिती महापौर सुनील प्रभू यांनी आज दिली. आर्थिक बाबींचा विचार करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
डॉ. व्हाईस ब्रॉडबॅण्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने आज पालिका मुख्यालयातील महापौर दालनात वायफाय सुविधेचे सादरीकरण करण्यात आले. मुंबईकरांना सुरक्षेची हमी देत ही सेवा मोफत देण्याचे उद्दिष्ट ठेवले जाईल. त्याबाबत जगातील प्रख्यात कंपन्यांशी संपर्क साधला जाईल. पालिकेच्या नियमांनुसार काम करण्यास तयार होणाऱ्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात येईल, असेही महापौरांनी या वेळी स्पष्ट केले.
या सुविधेमुळे नागरिकांवर रेडिएशनचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. येत्या तीन महिन्यांत शहरातील महापालिका मार्ग, हुतात्मा चौक, महात्मा गांधी मार्ग, श्यामप्रसाद मुखर्जी मार्ग चौक, मुंबई स्टॉक एक्सचेंज या परिसरात प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली

No comments:
Post a Comment