कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मागासवर्गीय वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 November 2013

कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मागासवर्गीय वीज कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्यांच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटने द्वारे मुंबई बांद्रा येथील प्रकाशगड व प्रकाशगंगा या कार्यालया समोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. 

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या वीज कंपन्या बनवून आठ वर्षे झाली असून कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांनी कंपनीला महसुल वाढवण्यासाठी व वीज हानी कमी करण्यासाठी, ग्राहकाला चांगली सेवा देण्यासाठी सहकार्य केले आहे. महापार्षण कंपनीला निकृष्ठ प्रतीचा कोळसा मिळत असतानाही संयत्र भार व उपलब्धता वाढविण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील आहेत. मात्र वीज कंपनी या कर्मचाऱ्यांच्या विरोधात अन्याय कारक धोरण राबवत असल्याचे संघटनेचे सरचिटणीस एन. बी. जारोंडे यांनी सांगितले. 

१ एप्रिल २०१३ पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीसाठी वाटाघाटी सुरु करून पगार वाढ करावी, वीज कर्मचाऱ्यांना शासनाच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करावी, मागासवर्गीयांचा रिक्त पदांचा अनुशेष विशेष मोहिमेअंतर्गत ३१ मार्च २०१४ पूर्वी भरण्यात यावा, वीज सेवक, लेखा सहाय्यक व इतर पदांवर कंत्राटी भरती करू नये हि पदे स्थायी स्वरुपात भरावीत, इत्यादी मागण्यायांसाठी अरुण भालेराव, अशोक सोनावणे यांच्या नेतृत्वा खाली निदर्शने केली

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS