विपश्यना सेवक संघाची मागणी
मुंबई - 30 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
भगवान बुद्धांच्या अस्थि आजही दिल्ली येथील राष्ट्रीय म्युझियम मध्ये आहेत. अस्थि ठेवण्यात आलेल्या म्युझियमच्या इमारती मधील वरील मजल्यांवर लोकांचा वावर असल्याने बुद्धांच्या अस्थींचा अवमान होत असल्याने या अस्थी नागपूर येथील दीक्षाभूमी, मुंबई येथील चैत्यभूमी किंवा गोराई येथील प्यागोडामध्ये मध्ये ठेवाव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे विपश्यना सेवक संघाचे विजय मेश्राम, सूर्यभान गेडाम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाबसाहेब आंबेडकर यांच्या नंतर पद्मभूषण विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी आपल्या ९० वर्षांच्या जीवनसंग्रामात जगामध्ये १७२ विपश्यना विद्यापीठे स्थापन करून भगवान बुद्धाचा दुख मुक्तीचा धम्म देवून सुख शांतीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे. यामुळे सत्यनारायण गोयंका गुरुजी यांना "भारतरत्न" पुरस्कार द्यावा अशी मागणी मेश्राम यांनी केली.
धम्माचा प्रसार करण्यासाठी आयडियल असा भिखू संघ निर्माण करण्याबाबत, विपश्यना विद्यापीठांचे रक्षण करण्यासाठी, शुध्द आणि परिपूर्ण अशा शिकवलेल्या आचार संहीताचे रक्षण करण्यासठी रविवार दिनांक १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता स्काउट गाईड हॉल शिवाजी पार्क, दादर पश्चिम मुंबई येथे विपश्यना झालेल्या उपासकांच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे गेडाम यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment