मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर रु ग्णालयात लवकरच कर्करुग्णांसाठी विशेष रुग्णालय बांधण्यात येणार असून तेथे त्यांना मोफत औषधोपचार तसेच केमोथेरेपी उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या सुविधेचा लाभ गरीब रुग्णांना होणार असून त्यामुळे टाटा रुग्णालयावरील भारही कमी होणार आहे.
नायर रुग्णालयासंदर्भातील सादरीकरणादरम्यान नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी ही माहिती दिली. नायर रुग्णालयात मार्च महिन्यात कर्करुग्ण विभागात साडेतीन हजारांहून अधिक रुग्ण उपचारासाठी आले, तर २ हजार ५00 रुग्णांवर केमोथेरेपीचा उपचार करण्यात आला. पुढील दोन वर्षांत नायर रुग्णालयाच्या बाजूलाच कर्करुग्णांसाठी विशेष रुग्णालय बांधण्यात येणार आहे. या रुग्णालयात कर्करुग्णांवर केमोथेरेपीचे उपचार मोफत करण्यात येतील. तसेच शस्त्रक्रियाही कमी दरात करण्यात येईल. येथे रेडियोथेरेपी २ शिफ्टमध्ये चालवण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत मोफत उपचार रुग्णांना देण्याचा मानस असून त्यासाठी टाटा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आरोग्य विभागाने तयार केला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल. त्यानंतर ही योजना कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment