मुंबई : दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी रेल्वे लाईन टाकण्याच्या कामासाठी १0 दिवसांचा स्पेशल ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ३0 डिसेंबर, २0१३ ते ९ जानेवारी, २0१४दरम्यान रोज ब्लॉक घेण्यात येणार आहे.
दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन टाकण्याचे काम सध्या मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी १0 दिवसांचा स्पेशल ब्लॉक घेण्यात येत आहे. दिवसभरात दोन वेळा १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११.३५ ते ११.५0 आणि दुपारी ३ ते ३.१५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसटीहून कल्याणसाठी सकाळी १0.३३ वा., १0.४३ वा. आणि दु. २.0१ वाजता सुटणार्या लोकल, सीएसटीहून टिटवाळय़ासाठी सकाळी ११ वा., दु. २.0९ वाजता सुटणार्या लोकल डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत तर टिटवाळय़ाहून सीएसटीसाठी सकाळी ११.१८ वा. सुटणारी, बदलापूरहून सीएसटीसाठी सकाळी ११.२२ वा. सुटणारी, कल्याणहून सीएसटीसाठी सकाळी ११.२५ वा. आणि दु. २.४३ वाजता सुटणारी आणि अंबरनाथहून सीएसटीसाठी दुपारी २.३९ वाजता सुटणार्या लोकल अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. त्याशिवाय सीएसटीहून डोंबिवलीसाठी सकाळी १0.४७ वाजता सुटणारी आणि डोंबिवलीहून सीएसटीसाठी दुपारी ३.३४ वाजता सुटणारी लोकल कुर्ला ते डोंबिवलीदरम्यान रद्द करण्यात येणार आहे. तसेच डोंबिवलीहून सीएसटीसाठी दुपारी १२.३0 वाजता सुटणारी आणि सीएसटीहून डोंबिवलीसाठी दुपारी १२.0५ वाजता सुटणारी लोकल पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे.

No comments:
Post a Comment