मुंबई : रिक्षा/टॅक्सी कायमस्वरूपी भंगारात काढण्याचे कोणतेही आदेश शासनाने दिले नाहीत, मात्र दलाल आरटीओ कार्यालयातच भंगारवाल्याला आणून रिक्षा अवसानात काढत असल्याचा दावा राजाराम बापू पाटील रिक्षा मालक व चालक सेवा संघाचे अध्यक्ष श्यामराव मोकाशी यांनी केला आहे. १ ऑगस्ट २0१३ पासून सोळा वर्षांपुढील रिक्षा व वीस वर्षांपुढील टॅक्सीचे परवान्यावर वाहनांच्या नोंदी कमी करणे अथवा पासिंग करू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र दलालांनी या निर्णयाचा गैरफायदा घेत रिक्षा/टॅक्सी भंगारात काढण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, आरटीओ कार्यालयातच दलालांनी भंगाराचा बाजार भरवला आहे. शासन दरबारी रिक्षा भंगारात काढण्याचा कोणताही निर्णय झाला नाही; परंतु; भंगारवाल्यांना हाताशी धरून दलाल आपले पोट भरत असल्याचा आरोप मोकाशी यांनी केला आहे. राज्यभर वर्षाला तीस हजार रिक्षा कायमस्वरूपी भंगारात जमा होणार आहेत. त्यामुळे रिक्षा/टॅक्सी चालक भिकारी होणार असून दलाल मजा मारणार असल्याचे मोकाशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Post Top Ad
30 December 2013
Home
Unlabelled
रिक्षा/टॅक्सी भंगारात काढण्याचे आदेशच नाहीत - मोकाशीं
रिक्षा/टॅक्सी भंगारात काढण्याचे आदेशच नाहीत - मोकाशीं
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment