23 December 2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : सीएसटीहून सुटणारी अंधेरी लोकल थेट गोरेगावपर्यंत धावणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या जोरात सुरू असल्यामुळे येत्या नवीन वर्षात म्हणजेच मार्च २0१४ मध्ये प्रवासी हार्बर मार्गाने थेट गोरेगावपर्यंत प्रवास करू शकणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मुंबई रेल विकास महामंडळाने एमयूटीपी फेझ-२चे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सीएसटीहून अंधेरीमार्गे थेट गोरेगावपर्यंत हार्बर सेवेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. एमयूटीपी फेझ-२ मध्ये सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा रेल्वे मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा रेल्वे मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहावा रेल्वे मार्ग आणि अंधेरी ते गोरेगावदरम्यान हार्बर मार्गाचा विस्तार या कामांचा समावेश आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत ५ हजार ३00 कोटी रुपये आहे.
सध्या हार्बर मार्गावर सीएसटी ते पनवेल आणि सीएसटी ते अंधेरी असा मार्ग आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना थेट गोरेगावपर्यंत जाता यावे, यासाठी एमयूटीपी-२ मध्ये हार्बरचा विस्तार गोरेगाव स्थानकापर्यंत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचे काम जोमाने सुरू आहे. अंधेरी ते गोरेगाव मार्गाच्या प्रकल्पाची एकूण किंमत १0३ कोटी रुपये आहे. या मार्गाचे काम हे मार्च २0१४ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
दोन बम्बार्डियर लोकल दाखल
उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एका लोकलची चाचपणी सध्या सुरू आहे. अशा ७२ लोकल उपनगरीय लोकलमध्ये दाखल होणार आहेत. चाचपणी झाल्यानंतर या लोकल उपनगरीय लोकलच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.
दोन बम्बार्डियर लोकल दाखल
उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात दोन नव्या बम्बार्डियर लोकल दाखल झाल्या आहेत. त्यापैकी एका लोकलची चाचपणी सध्या सुरू आहे. अशा ७२ लोकल उपनगरीय लोकलमध्ये दाखल होणार आहेत. चाचपणी झाल्यानंतर या लोकल उपनगरीय लोकलच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.


No comments:
Post a Comment