मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या सफाई कामगारांची दादर गौतम नगर येथे वसाहत वसाहत असून या वसाहती मध्ये सोमवारी रात्री मारवाडी मेघवाल समाजातील लोकांनी बौध्द समाजातील लोकांना केलेल्या मारहाणीत संजय जाधव यांचा मृत्यू झाला आहे.
गौतम नगर येथे सोमवारी रात्री शोभित मोहिते याच्या पहिल्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. जेवण कमी पडल्याने मोबाईल वरून जेवनाबाबत बोलणी सुरु असताना येथेच राहणाऱ्या मेघवाल मारवाडी समाजातील लोकानी संजय जाधव, विजय जाधव, विकास जाधव, सुमेध पवार, शिशिर पवार यांना मारहाण केली. यामध्ये संजय जाधव हे हार्ट पेशंट असल्याने त्यांचा या मारहाणी मुळे केइएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विजय जाधव यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर केइएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर विकास जाधव, सुमेध पवार, शिशिर पवार यांच्यावर उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.
गौतम नगर येथील मेघवाल मारवाडी समाजाचे सफाई कर्मचारी राहत असलेल्या पालिकेच्या इमारती धोकादायक असल्याने त्या खाली करण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. बौध्द समाजातील सफाई कर्मचारी राहत असलेल्या इमारती काही वर्षापूर्वीच दुरुस्त करण्यात आल्या असल्याने त्यांना नोटीसा देण्यात आलेल्या नाहीत. आपल्यालाच इमारती खाली करायला पालिका सांगत असल्याने मेघवाल समाजात प्रचंड असंतोष होता.
मेघवाल समाजातील लोकांनी माटुंगा कासारवाडी, सायन येथिल पालिकेच्या वसाहती मध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतू मेघवाल समाजातील गौतम नगर येथील लोक भांडखोर असल्याने त्यांना येथे स्वीकारण्यात आलेले नाही, यामुळे याचा सर्व राग सोमवारी रात्री झालेल्या मारहाणीत काढण्यात आला असे बोलले जात आहे. सध्या गौतम नगरला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून एसआरपीची तुकडी येथे ठेवण्यात आली आहे. याबाबत भोईवाडा पोलिस ठाण्य,अधे गुन्हा नोंद झाला असला तरी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


No comments:
Post a Comment