बँकांच्या संपामुळे २४ हजार कोटींचे चेक रखडले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2013

बँकांच्या संपामुळे २४ हजार कोटींचे चेक रखडले

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे २४ हजार कोटी मूल्याचे चेक व्यवहार रखडले आहेत. वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी देशातील सार्वजनिक बँकांचे सुमारे दहा लाख कर्मचारी एक दिवसाच्या संपावर गेले होते. याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे बँक कर्मचार्‍यांच्या सर्व संघटनांची पुढील आठवड्यात २३ डिसेंबर रोजी पुन्हा एक बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील कृतीची रूपरेषा निश्‍चित केली जाईल.

बँक कर्मचारी संपावर गेल्यामुळे देशभरातील सरकारी बँकांच्या ८५000 शाखा बंद होत्या. यामुळे ग्राहकांच्या एकूण ४0 लाख धनादेशांची क्लीअरिंग प्रक्रिया पूर्ण झाली नाही. या ४0 लाख धनादेशांचे एकत्रित मूल्य तब्बल २४000 कोटी रुपये आहे. संपामुळे केवळ ग्राहकांच्या चेकवर परिणाम झालेला नाही, तर सरकारी व्यवहार, परकीय चलन व्यवहार आणि नाणेबाजारातील व्यवहारांवरदेखील मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या संघटनेची २३ डिसेंबर रोजी पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे. या कामगार संघटनेत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचाही समावेश आहे. बँकांना होणारा तोटा हा पेन्शन आणि बुडित खात्यातील कर्जांसाठी अधिक तरतूद करण्यात आल्याने होत आहे. या दोन्ही कारणांना बँक कर्मचारी जबाबदार नाहीत. महागाई वाढल्याने पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे, तर बुडित कज्रे बँक व्यवस्थापनामुळे वाढत आहेत. याचा फटका कामगारांना का बसावा असा प्रश्न बँक कामगारांच्या संघटनांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS