हार्बर मार्गावर स्टंट करताना एका तरुणाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2013

हार्बर मार्गावर स्टंट करताना एका तरुणाचा मृत्यू

27/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : उपनगरी लोकलचा प्रवास सध्या अपघातांनी भरलेला आहे. मुंबईत लोकलमधून प्रवास करत असताना तरुणांकडून करण्यात येणार्‍या स्टंटबाजीमुळे अपघातांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रोज एक तरुण प्रवासी या स्टंटबाजीमुळे मृत्युमुखी पडत आहे. गुरुवारीही हार्बर मार्गावरील चेंबूर आणि टिळकनगर स्थानकांदरम्यान रेल्वेमध्ये स्टंट करणार्‍या तरुणाचा तोल गेल्यामुळे मृत्यू झाला. रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि जीआरपीने वेळीच कडक कारवाईचे धोरण स्वीकारले नाही तर मृत्यूचे प्रमाण वाढतच जाईल.

उपनगरी रेल्वेमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असली, तरी लोकलच्या दरवाजावर हवा खाण्यासाठी उभे राहणे, दरवाजात स्टंट करणे, टपावरून प्रवास करणे, चालत्या लोकलच्या डब्यामधून टपावर चढण्याची कला सध्या उपनगरी रेल्वेमध्ये पाहावयास मिळते. ही स्टंटगिरी करणारे तरुण अवघ्या १६ ते २५ वयोगटातील असतात. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरमधून डीसी असल्यास २५00 होल्ट, तर एसी असल्यास २५ हजार व्होल्ट विद्युत प्रवाह प्रवाहित होत असतो. त्यामुळे टपावरून प्रवास करणारी व्यक्ती त्याच्या संपर्कात आली की त्या व्यक्तीचे 

क ाय होत असेल, हे जरी मुंबईकर प्रवाशांच्या लक्षात आले असले तरी स्टंटबाजी करणार्‍या तरुणांच्या मात्र काही केल्या लक्षात येत नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास हार्बर मार्गावरील चेंबूर ते टिळकनगर स्थानकांदरम्यान अप मार्गावरील लोकलमध्ये स्टंट करणार्‍या तरुणाचा तोल गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑगस्ट महिन्यातही हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकात लोकलच्या टपावरून प्रवास करणारा एक युवक होरपळून मृत्युमुखी पडला. 

त्या घटनेनंतर तीन-चार दिवसांतच सकाळच्या वेळेत मेन लाइनच्या सायन-माटुंगा स्थानकांदरम्यान लोकलच्या दरवाजात लटकणारे ४ जण खाली कोसळले होते. त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे प्रशासनाला या अपघाताला कारणीभूत ठरवले जाते. रेल्वे प्रशासनाने दर ३ मिनिटाला एक स्वच्छ लोकल चालवावी अशी अपेक्षा मुंबईकर करतात; परंतु त्याच वेळी स्टंटबाजी करून स्वत:चा आणि इतर सहप्रवाशांचा जीव धोक्यात घालणार्‍या प्रवाशांना धडा शिकवण्याचा प्रयत्न मात्र प्रवासी संघटना करताना दिसत नाहीत. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS