पुन्हा मध्य रेल्वेवर सीव्हीएम कूपन्स रांगेशिवाय उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2013

पुन्हा मध्य रेल्वेवर सीव्हीएम कूपन्स रांगेशिवाय उपलब्ध

मुंबई : मध्य रेल्वेचे सीव्हीएम कूपन रांगेत उभे राहिल्याशिवाय उपलब्ध होत नव्हते.परिणामी, अनेक प्रवासी सीव्हीएम कूपनचा पर्याय स्वीकारताना दिसत नव्हते. ही बाब हेरून तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय व्हावी यासाठी सीव्हीएम कूपन रांगेशिवाय उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

पश्‍चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी 'ऑटोमॅटिक तिकीट व्हॅलिडेटिंग मशीन (एटीव्हीएम), सीव्हीएम 'जनसाधारण तिकीट बुकिंग सेवा' (जेटीबीएस) यंत्रणा सुरू केली. मात्र सीव्हीएम मशीन्सच्या देखभालीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वेने एटीव्हीएम ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र तरीही खिडक्यांवरील गर्दी कमी होत नसल्याने 'सीव्हीएम'चा वापर सुरू ठेवण्यात आला होता.

तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने नव्या वर्षात सीव्हीएम कूपन रांगेशिवाय उपलब्ध करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला असून हा निर्णय निश्‍चितच प्रवाशांच्या सोयीचा ठरणार आहे. रेल्वे बोर्डाने सीव्हीएम यंत्रणा मार्च २0१४ मध्ये बंद करण्याची सूचना परे आणि मरे प्रशासनास केली होती. तरीही प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दोन्ही रेल्वेने सीव्हीएम पद्धत कालबाह्य केली नाही. मात्र त्यात मरेने ही कूपन्स घेण्यासाठी रांग लावणे अनिवार्य केले. तर परेने रांगेशिवाय कूपन्स उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परेचा कूपन्सचा वापर वाढला तर मरेचा कूपन्सचा वापर केवळ ५ टक्क्यांवर आला; परंतु मरेने प्रवाशांची निकड लक्षात घेऊन मरेनेही कूपन्ससाठी रांगेत उभे राहण्याची अट काढून टाकली आहे. त्यानुसार, १ जानेवारीपासून रांग न लावता कूपन्स मिळणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. मात्र ही कूपन्स योजना मार्चपर्यंत बंद करण्याची सूचना रेल्वे बोर्डाने केली आहे. त्यासाठी दोन्ही रेल्वेने या योजनेस आणखी एक वर्ष अभय देण्याची शिफारस रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS