राखीव भूखंड शाळेसाठी दर्डा कुटुंबीयांनी घेतल्याचा यवतमाळच्या दांपत्याचा आरोप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2013

राखीव भूखंड शाळेसाठी दर्डा कुटुंबीयांनी घेतल्याचा यवतमाळच्या दांपत्याचा आरोप

मुंबई 12/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :

मुंबई -  यवतमाळ येथील खेळासाठी राखीव असलेले दोन भूखंड खासगी मालकीच्या शाळेसाठी दर्डा कुटुंबीयांनी घेतल्याचा आरोप दिगंबर आणि वंदना पजगाडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची याचिका मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याने उच्च न्यायालयासमोर आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला. तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याने प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर पोलिस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीत दर्डा कुटुंबीयांवर ठपका ठेवण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार विजय दर्डा, ऋषी दर्डा, देवेन दर्डा हे शाळेचे संचालक आहेत. 

 
नवा प्रस्ताव तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यांनी तो नगरविकासकडे दिला. नगरविकासने तो शहर नियोजनकडे पाठवला. अखेरीला मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2010 मध्ये दोन्ही वादग्रस्त भूखंड दर्डा यांच्या शाळेस हस्तांतरित करण्यास मंजुरी दिल्याची माहिती पजगाडे यांनी दिली. 
वडगाव रोड ग्रामपंचायतीने दोन्ही भूखंड दर्डा यांच्या शाळेस देण्याचा ठराव 1992 मध्ये केला होता, परंतु दोन्ही भूखंड सोसायटीच्या सामुदायिक मालकीचे आहेत. त्यामुळे त्या हस्तांतरणास मान्यता देण्याचा ग्रामपंचायतीला हक्क नाही, असे पजगाडे यांचे म्हणणे आहे. 
 
गेली 20 वर्षे या अतिक्रमणाविरोधी मी भांडत आहे. या प्रकरणातून माझ्यावर तीन प्राणघातक हल्ले झाले. त्याचा तपास पोलिस करत नाहीत. घरातून बाहेर पडणेही आम्हाला मुश्कील झाले आहे. त्यामुळे आम्ही मुंबई उच्च न्यायालयासमोर देहत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिगंबर आणि वंदना पजगाडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS