बेस्ट मध्ये मुख्य जनसंपर्क अधिकारी पद रिक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2013

बेस्ट मध्ये मुख्य जनसंपर्क अधिकारी पद रिक्त

मुंबई / अजेयकुमार जाधव - 12/12/2013- http://jpnnews.webs.com (JPN NEWS website):
बेस्ट उपक्रमाची माहिती मुंबईकर जनतेला व प्रवाशांना मिळावी म्हणून मुख्य जनसंपर्क विभाग बनवून जनसंपर्क अधिकारी हे पद निर्माण केले आहे. मुख्य जनसंपर्क अधिकारी पदी असलेले विरेंद्र बागुल हे ३० नोव्हेंबरला निवृत्त झाल्याने या पदावर कोणत्याही अधिकाऱ्याची नेमणूकच झाली नसल्याने मुख्य जनसंपर्क अधिकारी पद आजही रिक्त आहे. 

विरेंद्र बागुल सेवानिवृत्त होण्याच्या सहा महिने आधी महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारी नेमण्यासाठी निर्देश दिले होते. बेस्ट मधील अधिकाऱ्यांनी या निर्देशांकडे दुर्लक्ष केल्याने मुख्य जनसंपर्क अधिकारी पदावर अद्याप कोणाचीही नेमणूक झाली नाही. जनसंपर्क अधिकारी पदावर लोकांशी चांगला संवाद साधणारा पत्रकारितेची पदवी असलेला अधिकारी नेमावा अशी अपेक्षा मुंबईकर नागरिकांची आहे. याआधी बेस्टने चांगले  जनसंपर्क अधिकारी दिले आहेत. मुंबईकर नागरिकांना अपेक्षा असलेले मनोज वऱ्हाडे नावाचे उप जनसंपर्क अधिकारी सध्या कार्यरत आहेत त्यांच्यामध्ये मुख्य जनसंपर्क अधिकारी बनवावे अशी पदवी मुंबईकरांना योग्य व चांगली माहिती देण्याची कला सुद्धा आहे. 

परंतु बेस्ट प्रशासनामध्ये जनसंपर्क विभागामधील अधिकाऱ्याला त्याच विभागातील उच्च पद देण्याचा नियम नाही. या जागेवर बेस्ट मधील इतर कोणत्याही विभागातील अधिकारी जेष्टतेनुसार आणून बसवला जातो. यामुळे जनसंपर्क अधिकारी हे पद रिक्त असतानाही बेस्ट प्रशासनाला या पदावर अद्याप कोणाचीही नेमणूक करता आलेली नाही. बेस्ट मध्ये मुख्यजनसंपर्क अधिकारी पदावर साजेशा असा अधिकारी आपल्या जनसंपर्क विभागात असतानाही प्रशासन किवा बेस्ट समितीला बेस्ट मधील नियमांमुळे हे पद रिक्त ठेवावे लागले आहे. उप जनसंपर्क अधिकारी पदावर असलेले मनोज वऱ्हाडे यांना मुख्य जनसंपर्क अधिकारी बनवावे अशी चर्चा सुरू असून बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले व महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी स्वता लक्ष घालून हे पद त्वरित भरावे, वऱ्हाडे यांना या पदावर नेमणूक करण्यास अडचणी असल्यास बेस्ट मधील पत्रकारितेची पदवी प्राप्त करणाऱ्या अधिकारयाची नेमणूक त्वरित करावी अशी मागणी केली जात आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS