मध्य रेल्वेला डीसी-एसीचा फटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2013

मध्य रेल्वेला डीसी-एसीचा फटका

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या डीसी-एसी विद्युत रूपांतरणाचे काम पूर्ण झाले असले तरी हे प्रकरण आता रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे गेल्यामुळे रेल्वेला दररोज सुमारे १ कोटी रुपयांची वीज लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी रेल्वे बोर्ड प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पामुळे ठाणे ते कल्याणदरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.

ठाणे ते कल्याणदरम्यान अप-डाऊन दोन्ही मार्गांवरील धिम्या आणि जलद मार्गावरील तसेच एलटीटी ते ठाणेदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे डीसीमधून एसीमध्ये विद्युत रूपांतरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवार, १0 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेतीन तासांचा ब्लॉक मध्य रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात येणार होता. तसे लेखी पत्रसुद्धा रेल्वे सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र सुरक्षा आयुक्तांनी आतापर्यंत ओव्हरहेड वायरमुळे कि ती प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाक डे मागितली होती. त्याचबरोबर एसी ट्रॅक्शन मॅन्युअलच्या अंतर्गत १६0 किलोमीटर प्रतितास या वेगाचा हवाला देत परवानगी देण्यात मनाई केली होती. त्यानंतर हे प्रकरण रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे गेले. मुख्य सुरक्षा आयुक्तांनी रेल्वे बोर्डाला मध्य रेल्वे मार्गावरील डीसी-एसी रूपांतरणाला असलेल्या १0 समस्यांची यादीच पाठवून दिली. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी रेल्वे बोर्डाने मुख्य सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या १0 समस्यांचे उत्तर देत पुन्हा एकदा डीसी-एसी रूपांतरणाची तयारी सुरू केली. परंतु अद्याप मुख्य सुरक्षा आयुक्तांनी याला परवानगी दिलेली नाही. मुख्य सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या उत्तरामध्ये रेल्वे बोर्डाने असे स्पष्ट म्हटले आहे की, उपनगरीय रेल्वे मार्गावर लोकल गाड्या या १६0 नव्हे तर १0५ किमी प्रति तास या वेगाने धावतात. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर डीसी-एसीचे विद्युत रूपांतरण करण्याची सर्व तयारी झालेली आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावरही लोकल गाड्या १0५ किमीच्या वेगाने धावतात. पश्‍चिम रेल्वे मार्गावर एसीचे काम पूर्ण झाले आहे. असे असले तरी मुख्य सुरक्षा आयुक्त मध्य रेल्वेसाठीच का एसी ट्रॅक्शन मॅन्युअलचा मुद्दा उपस्थित करीत आहेत, असा प्रश्न मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पडला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS