मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 December 2013

मुंबई मराठी पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी 'पत्रकार दिनी' देण्यात येणारे पत्रकारितेतील विविध पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. दै. महाराष्ट्र टाइम्सचे नितीन चव्हाण, दै. लोकसत्ताचे संजय बापट, साप्ताहिक चित्रलेखाचे डॉ. जे. बी. शिंदे,ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांना हे या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. येत्या ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, अशी माहिती संघाचे कार्यवाह प्रमोद तेंडुलकर यांनी गुरुवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. नितीन चव्हाण यांना कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार, संजय बापट यांना नवसंदेशकार रमेश भोगटे पुरस्कार, जे. बी. शिंदे यांना विद्याधर गोखले पुरस्कार, तर नीला उपाध्ये यांना जयहिंद प्रकाशन पुरस्कार जाहीर झाला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS