महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा गाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2013

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टच्या जादा गाड्या

3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर आणि उपनगरातील विविध ठिकाणांहून शिवाजी पार्क, दादर येथे येणार्‍या जनतेच्या सोयीसाठी उपक्रमातर्फे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून बसमार्ग ५३, २४१, ३५१, ३५४ आणि ४६३ या बस मार्गावर रात्री उशिरापर्यंत १0 जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच ६ डिसेंबर २0१३ रोजी पहाटे ६ वाजल्यापासून बसमार्ग २७, ३८, ५३, ६३, ९ र्मयादित, २४१, ३0५, ३५४, ३५७, ३८५, ४६३, ५0४ र्मयादित आणि ५२१ र्मयादित या बस मार्गावर एकूण ३३ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

प्रवाशांच्या मदतीसाठी वाहतूक अधिकार्‍यांची तसेच बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर शिवाजी पार्क येथून दैनंदिन बस पासेसची विक्री क रण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता जादा बसेसच्या तसेच दैनंदिन बस पास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन बस प्रवाशांना करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS