बेस्ट ऑक्सिजनवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 December 2013

बेस्ट ऑक्सिजनवर

4/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईकरांची सेकण्ड लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणार्‍या बेस्टची लाइफच सध्या ऑक्सिजनवर आहे. बेस्टच्या ५0२ बसमार्गांपैकी एकही बसमार्ग फायद्यात चालत नसल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात ७, ऑगस्ट महिन्यात ४ बसमार्ग 'अ' विभागात म्हणजेच फायद्यात होते. तर सप्टेंबर महिन्यात एकही बसमार्ग फायद्यात चालत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बेस्टचा आर्थिक गाडा कसा हाकायचा? असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहे.

बेस्ट प्रशासनातर्फे विद्युत पुरवठा आणि परिवहन असे दोन विभाग चालवण्यात येतात. त्यापैकी परिवहन विभागातर्फे मुंबईत बेस्टच्या बसेस चालवण्यात येतात. बेस्ट प्रशासनाक डे एकूण ४१६७ बसेस आहेत. त्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात एकूण ५0२ बसमार्गांवर चालवण्यात येतात. बेस्टतर्फे चालवण्यात येणार्‍या बसेसचे तीन विभागांत वर्गीकरण केलेले आहे. 'अ' विभागातील बसेस म्हणजे आस्थापन खर्च आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च निघतो, 'ब' विभाग म्हणजे बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च निघतो, तर 'क' विभागातील बसेस म्हणजे या बसेस संपूर्णपणे तोट्यात चालतात. बेस्टला एक बस १ किलोमीटर चालवण्यासाठी ८२ रुपये खर्च येतो. वाढणार्‍या डिझेलच्या किमती, टायर व ट्युब्सच्या किमती, कर्मचार्‍यांचा पगार आणि आस्थापना खर्च यांच्यामुळे बेस्टचा तोटा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच सध्या एकही बसमार्ग फायद्यात नसल्यामुळे बेस्टची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. 

बेस्टमधून दिवसाला ४0 ते ४५ लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यातून दिवसाला ३ कोटी ६५ लाख रुपये उत्पन्न बेस्टला मिळते; परंतु परिवहन विभागाचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे बेस्टची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. 

बेस्ट प्रशासन हे मुंबई महानगरपालिकेचा एक भाग असला तरी बेस्टला कोणत्याही पद्धतीची सबसिडी किंवा आर्थिक मदत देण्यात येत नाही. राज्यात ज्या इतर सार्वजनिक वाहतूक सेवा आहेत, त्यांना पालिका प्रशासनातर्फे सबसिडी दिली जाते, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत नाही; परंतु बेस्टला महानगरपालिकेने सावत्रपणाची वागणूक दिल्यामुळे बेस्ट प्रशासन आर्थिकदृष्ट्या हतबल झाले आहे.बसचा ताफा - ४१६७
ऑर्डिनरी - ३४१
लिमिटेड - ७0
कॉरिडॉर - ८
वातानुकूलित - १२

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS