3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : राज्य सरकारने इंदू मिलच्या जागेवर ५ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन करावे; अन्यथा ६ डिसेंबर रोजी इंदू मिलची जागा ताब्यात घेऊन आम्हीच भूमिपूजन करू, असे सांगतानाच या वेळी आंबेडकरी जनतेचा उद्रके होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी दिला आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने २५ नोव्हेंबर रोजी इंदू मिलची साडेबारा एकर जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. हा यासंदर्भात आरपीआयने छेडलेल्या आंदोलनाचा विजय आहे.
इंदू मिलची जागा स्मारकासाठी हस्तांतर करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय लोकसभेत मंजूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे संसदेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी ५ डिसेंबरला या निर्णयास संसदेची मंजुरी मिळवावी आणि त्याच दिवशी सायंकाळी इंदू मिलमध्ये स्मारकाचे भूमिपूजन करण्यात यावे. येत्या २-३ दिवसांत सरकारने सर्व परवानग्या घेऊन ५ डिसेंबरला या स्मारकाचे भूमिपूजन करावे; अन्यथा आरपीआयचे कार्यकर्ते इंदू मिलमध्ये घुसून या जागेचा ताबा घेऊन स्मारकाचे भूमिपूजन करतील.
भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही शांततेच्या मार्गाने करणार आहोत. या वेळी पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये. या वेळी रक्त सांडण्याची वेळ आली तरी जयभीमसाठी कुर्बान होणारे भीमसैनिक मागे हटणार नाहीत, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment