बालकांमधील कर्करोगाच्या प्रमाणात वाढ
3/12/2013 http://jpnnews.webs.com
नवी दिल्ली : देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी सक्षमपणे पेलण्यासाठी सज्ज होणार्या बालकांना कर्करोगाचा विळखा पडल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सामान्यपणे प्रौढ व्यक्तींमध्येच आढळणार्या कर्करोगाचे प्रमाण बालकांमध्येही वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशातील बालकांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. देशातील विविध राज्यांतल्या १४ वर्षांपर्यंतच्या ८१८६९ मुलांना कर्करोग झाल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे. यातील सर्वाधिक १३७२६ बालके ही उत्तर प्रदेशातील आहेत, तर त्यानंतर दुसर्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ७५२३ बालकांचा समावेश आहे. दिल्लीत सर्वात कमी १0५८ बालकांना कर्करोग असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. देशासाठी ही चिंतेची बाब असून, कर्करोगाविरुद्धचा लढा तीव्र करण्याची गरज असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये बालकांतील कर्करोगाचे प्रमाण २.९ टक्के असल्याचे एम्सच्या इन्स्टिट्यूट ऑफ रोटरी कॅन्सरचे प्रमुख ललित कुमार यांनी सांगितले. सामान्यपणे प्रौढ व्यक्तींमध्ये आढळणार्या कर्करोगाचे प्रमाण लहान मुलांमध्येही वाढण्यासाठी प्रामुख्याने आजच्या काळातील बेशिस्त जीवनशैली व खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींना त्यांनी जबाबदार धरले आहे. भारतात जीभ, तोंड, आतडे, मलाशय, लिव्हर, फुफ्फुस आणि प्रोस्ट्रेट कर्करोगाच्या प्रमाणात खूप वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे, तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही लक्षणीय वाढल्याचे या अहवालातून समोर आले आहे, १५ वर्षांपूर्वी भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त होते. राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत केवळ १0 टक्के रुग्णांचीच नोंदणी होत असल्याची खंत तज्ज्ञांनी या वेळी व्यक्त केली. कर्करोगाच्या सर्व रुग्णांची नोंदणी होणे आवश्यक असल्याचेही ते पुढे म्हणाले.

No comments:
Post a Comment