23 December 2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : २00२ पर्यंत झोपड्यांना पात्र ठरवण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने येत्या २८ डिसेंबर रोजी झोपडपट्टी अधिकार रॅली काढण्यात येणार आहे. आमदार अबू आसिम आझमी यांच्या समवेत या रॅलीत उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री सहभागी होणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा झोपडपट्टी अधिकार रॅलीचे आयोजक एस. एम. खान यांनी दिली. जोगेश्वरीत नूर हॉटेल, बेहराम बाग येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये हजारोंच्या संख्येने झोपडीधारक सहभागी होणार आहेत.
झोपडीधारकांच्या प्रलंबित मागण्यांवर आवाज उठवण्यासाठी आणि २00२ पर्यंत झोपड्यांना पात्र ठरवण्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने आयोजित या रॅलीत प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अबू आझमी, उत्तर प्रदेशचे मंत्री ओमप्रकाश सिंह, राज्यमंत्री शाहिद मंजूर तसेच आमदार सुभाष पासी उपस्थित राहणार आहेत. तसेच भोजपुरी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक सिने कलावंत या रॅलीत सहभागी होणार असून मीरा मूर्ती व धर्मेंद्र सोळंकी याचा बिरहा जंगी सामनाही आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीबाबत माहिती देताना आयोजक एस. एम. खान म्हणाले की, राज्य सरकारने १९९५ पर्यंत झोपड्या अधिकृत केल्या आहेत. मात्र २00२ पर्यंत झोपड्या अधिकृत कराव्यात, अशी आमची मागणी असून त्यासाठीच या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment