23 December 2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने एम/पूर्व विभागात बैंगणवाडी येथे रविवारी आरोग्य शिबीर भरवण्यात आले. या शिबिराचा सुमारे अडीच हजार नागरिकांनी लाभ घेतला.
सपाचे प्रदेशाध्यक्ष आ. अबू आझमी यांनी या शिबिराचे उद््घाटन केले. या वेळी सपाचे गटनेते रईस शेख, नगरसेविका रेश्मा नेवरेकर, नूरजहाँ रफिक शेख उपस्थित होत्या. महापालिकेची तिन्ही प्रमुख रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खाते मिळून सुमारे ३५ वैद्यकीय अधिकारी, ६0 आरोग्य कर्मचारी यांनी या शिबिरात रुग्णांची तपासणी केली आणि आवश्यक ते प्रथमोपचार तसेच वैद्यकीय समुपदेशन केले. विशेषत: विविध संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी, प्रतिबंधात्मक उपाय तसेच बालकांसंदर्भात आरोग्य दक्षता, त्यांचा आहार या विषयांवर जनजागृती करण्यात आली. बालचिकित्साबाबत या शिबिरात विशेष समुपदेशन करण्यात आले. अंगणवाडी
कर्मचार्यांनीही शिबिराच्या संयोजनास हातभार लावला. सपाचे गटनेते रईस शेख यांनी सांगितले की, बैंगणवाडीसारख्या मागास भाग म्हणून ओळखल्या जाणार्या या परिसरात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आरोग्य शिबीर भरविण्यात आले असून परिसरातील हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. यापुढेही आरोग्य महाशिबीर भरवून आरोग्य जनजागृती करण्यात येईल, असे त्यांनी या वेळी नमूद केले.

No comments:
Post a Comment