लोहार-सुतार समाजाचे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2013

लोहार-सुतार समाजाचे आंदोलन

27/12/2013 http://jpnnews.webs.com

मुंबई : लोकसंख्येच्या प्रमाणात सुतार समाजाला एन.टी. प्रवर्गात समाविष्ट करावे, विश्‍वकर्मा आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी, प्रत्येक जिल्ह्यात तालुका औद्योगिक वसाहतीत सुतार व लोहार समाज बांधवांसाठी जागा राखीव ठेवावी, उत्पादित मालासाठी शासनाने हमी द्यावी, १0 लाखांपर्यंत विना तारण कर्ज द्यावे अशा विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र सुतार-लोहार संघाच्या वतीने संघाचे प्रदेशाध्यक्ष सुदाम खैरनार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शासनाने राज्यातील ३५ लाख सुतार-लोहार समाजाला वेळोवेळी आश्‍वासना पलीकडे काहीच दिले नाही. शासकीय महामंडळ व विधान परिषदेत या समाजाचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे या समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती झालेली नाही. त्यामुळे आता नाही तर कधी नाही, अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी या पुढचे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS