25/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : हेरिटेज कमिटीने दादर शिवाजी पार्क परिसराला हेरिटेजमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन काँग्रेसचे खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी मंगळवारी आपला आक्षेप नोंदवण्यासाठी पालिका मुख्यालयात हेरिटेज समितीचे अध्यक्ष दिनेश अफझलपूरकर यांची भेट घेतली.
वास्तविक, अफझलपूरकर आणि मुणगेकर भेटीला राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मुणगेकर हे काँग्रेसतर्फे दादर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, तर शिवसेनेचे राहुल शेवाळे (स्थायी समिती अध्यक्ष) हेदेखील याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवाजी पार्क येथील हेरिटेजचा प्रश्न हा येथील लोकसभा उमेदवारांचा निवडणूक विषय असणार आहे. त्यामुळेच मनसे, शिवसेना, काँग्रेसनेही हेरिटेजचा विषय लावून धरला आहे. खा. मुणगेकर यांनी हिंदू कॉलनीसह इतर महत्त्वाच्या ठिकाणांना हेरिटेजमध्ये टाकल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment