मुंबईकरांचा रेल्वेचा प्रवास ५ ते १0 रुपयांनी महागणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 December 2013

मुंबईकरांचा रेल्वेचा प्रवास ५ ते १0 रुपयांनी महागणार

25/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : उपनगरीय मार्गावरील छोट्या अंतरावरील प्रवासावरील प्रस्तावित अधिभाराचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडून संमत होण्याची शक्यता आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ६ ते १0 किमीच्या प्रवासाचे भाडे ५ ते १0 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. जवळपास २0 टक्के मुंबईकर १0 किमीच्या आत प्रवास करतात, त्यापैकी ७ ते १0 टक्के प्रवासी ५ किमीपर्यंतचा प्रवास करतात.

रेल्वेकडून १0 किमीपर्यंतच्या प्रवाशांवर कोणताही अधिभार आकारण्यात येत नव्हता. या स्थितीत ऑक्टोबरमध्ये एमआरव्हीसीने १0 किमीच्या प्रवासासाठी २४ टक्के अधिभाराची सूचना केली होती. त्यामुळे प्रक ल्पांसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करता येणार आहे. या स्थितीत एमआरव्हीसीच्या अधिकार्‍यांनी रेल्वे बोर्डातील सदस्यांशी झालेल्या चर्चेनंतर ५ किमीच्या प्रवासावर कोणताही अधिभार न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जातील हप्त्याची रक्कम अधिभारासाठी वापरात येणार आहे. जागतिक बँकेकडून १ हजार ६१३ कोटी रुपये आणि १ हजार ९१0 कोटी रुपयांचा निधी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टमधील एक आणि दोन प्रकल्पांसाठी कर्ज म्हणून घेण्यात आला आहे. या कर्जाची परतफेड करताना अधिभार लागू करण्याची अट जागतिक बँकेने घातली होती.

…असा महागणार प्रवास
हा प्रस्ताव मंजूर झाला तर ६ किमीपर्यंतच्या सेकंड क्लाससाठी ५ ते १0 रुपयांची, तर फस्र्ट क्लाससाठी ४४ ते ५५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सेकंड क्लासचा पास १५ रुपये, तर फस्र्ट क्लासचा पास ७५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. एमआरव्हीसीच्या संचालक मंडळाने सरसकट १0 किमीच्या प्रवासावर अधिभाराच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. केवळ ६ ते १0 किमीच्या प्रवासावरील अधिभारामुळे वार्षिक ३0 ते ३५ कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS