चौकशीची मागणी
मुंबई - 8 /12/2013 - http://jpnnews.webs.com
अंधेरी येथे पालिकेचे बीएसइएस हे रुग्णालय असून ब्रम्हकुमारी संठेकडून चालवण्यात येणाऱ्या या रुग्णालयात गरीब रुग्णांना सापत्न वागणूक दिली जाते, गरीब रुग्णांना रुग्णालयात दखलच करून घेतले जात नाही, रुग्णालयाला नेमून दिलेल्या फी पेक्षा जास्त फी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल केली जात असल्याने या रुग्णालय प्रशासनावर कारवाही करावी अशी मागणी कल्पेश झांझरुकीया यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालिका आयुक्त, व अतिरिक्त आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कल्पेश झांझरुकीया यांना पोटात दुखत असल्याने बीएसइएस या रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा साल डॉक्टरांनी दिला होता. परंतू रुग्णालय प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल करून घेतले नव्हते. पत्रकारांच्या सहाय्याने कल्पेश व त्यांच्या नातेवाईकांनी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांची भेट घेतल्यावर कल्पेश याला रुग्णालयात दाखल करून घ्यावे असे आदेश डॉ. गावडे यांना देण्यात आले. गावडे यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केल्यावर उशिरा कल्पेश याला रुग्णालयात दाखल केले आहे.
या रुग्णालयामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. इलेक्ट्रिक सब स्टेशनवर क्यान्टींग चालवण्यात येत आहे, रुग्णालयाच्या इमारती मध्ये तोडफोड करून बांधकाम करण्यात आले आहे, रुग्णांकडून मलेरियाच्या टेस्टसाठी ९६ रुपये, सोनोग्राफी साठी १२०० रुपये, हिमोग्लोबिन टेस्ट साठी १०० रुपये, क्रॉस म्याचींग साठी ४०० रुपये घेतले जात आहेत. जनरल पेशंटला या रुग्णालयात दाखल करूनच घेतले जात नाही. यामुळे या आधीही स्थानिक माजी आमदार अभिराम सिंग यांनी या रुग्णालयाची चौकशी करावी अशी मागणी केली होती. स्टयान्डींग कमिटीमध्ये मध्ये सुद्धा २००७ मध्ये या रुग्णालयाची चौकशी करावी अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली होती. परंतू या रुग्णालयाला प्रशासन क्लीन चिट देत असल्याने कल्पेश यांनी या रुग्णालयाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


No comments:
Post a Comment