पालिकेला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर असल्याचा विसर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2013

पालिकेला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर असल्याचा विसर

जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाहीची मागणी
मुंबई - 8 /12/2013 -  http://jpnnews.webs.com 
भारतीय राज्य घटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो भीम अनुयायांना पालिकेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळावी म्हणून पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेमध्ये जाणून बुजून राज्य घटनेचे शिल्पकार असा उल्लेख करण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे असा आरोप कोंडीवटे बुद्ध लेणी बचाव कृती समिती सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी केला आहे.

डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा ५७ वा महापरिनिर्वाण दिन नुकताच संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा मुंबई महानगर पालिकेद्वारे चैत्यभूमी येथे नतमस्तक व्हायला आलेल्या भीम अनुयायांना सोयी सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. सालाबाद प्रमाणे याही वर्षी पालिकेच्या जन संपर्क विभागाने या सोयी सुविधांची व बाबासाहेबांच्या जीवनाची माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये प्रसिद्ध केली आहे. परंतू या माहिती पुस्तिकेमध्ये जाणून बुजून डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार होते असा उल्लेख करण्याचे टाळण्यात आले आहे असे जाधव यांनी सांगितले.

मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी "डॉ. आंबेडकर एक महान अर्थतज्ञ" या लेखामध्ये भारतीय राज्याघात्नेचे शिल्पकार डॉ. बाबसाहेब आंबेडकर असा एकमेव उल्लेख या पत्रिकेत केला आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर १९५६ या महापरिनिर्वाण दिनी सांताक्रूझ ते दादर हे अंतर राजगृह ते दादर चौपाटी असे आणि ७ डिसेंबरला १९५६ ला १२ ते १५ लाख स्त्री-पुरुष उपस्थित होते, असे चुकीचे आकडे देवून बाबासाहेबांचा मुंबई महानगर पालिकेने अवमान केला आहे असे जाधव यांनी सांगितले आहे.

घटनाकार डॉ. आंबेडकर यांची घटनेचे शिल्पकार अशी नोंद जाणून बुजून न घेणाऱ्या जनसंपर्क अधिकाऱ्याचा जाहीर निषेध करून यापुढे महापारीनिर्वान दिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या माहिती पुस्तिका तयार करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत आणि साहित्तिक यांची प्रकाशन समिती नेमून सदोष माहिती पुस्तिका प्रकाशित करावी व बाबासाहेबांचा जीवनपट आणि त्यांचे कार्य योग्य पद्धतीने जनतेपर्यंत जाईल याची पालिकेने दक्षता घ्यावी. तसेच बाबासाहेबांबाबत अक्षम्य अशी चूक करणाऱ्या पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर मुंबईचे महापौर सुनील प्रभू आणि पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी कारवाही करावी अशी मागणी प्रकाश जाधव यांनी केली आहे.

पुस्तिकेच्या चौकशीची मागणी 
मुंबई महानगर पालिकेद्वारे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या माहिती पुस्तिकेच्या प्रिंटींग आणि डिझाइनचा दर जास्त दाखवून जनसंपर्क अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचार होत असल्याचे महानायक मध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते. यावर पालिकेने कोणतीही कारवाही केली नाही. असे असताना यावर्षी ५० हजार पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आल्या असे सांगण्यात आले आहे. महापौरांच्या हस्ते प्रकाशन झाले तयावेलीच या पुस्तिका भीम अनुयायांना वितरीत केल्या त्यानंतर कोणालाही सदर पुस्तिका मिळाली नसल्याने खरोखर ५० हजार माहिती पुस्तिका छापण्यात आल्या का आल्या असल्यास त्या कोणाला वाटण्यात आल्या याची चौकशी करण्याची मागणी आंबेडकरी जनतेकडून केली जात आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS