19/12/2013- http://jpnnews.webs.com
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण स्थानकांदरम्यानच्या डीसी-एसी विद्युत रूपांतरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे ठाणे ते कल्याणदरम्यानचा प्रवास जलद होणार आहे, मात्र या कामात काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी आक्षेप घेतल्यामुळे आणि हे प्रकरण रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे गेल्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांचा वेग वाढण्याला खिळ बसणार आहे.
ठाणे ते कल्याणदरम्यान अप-डाऊन दोन्ही मार्गांवरील धीम्या आणि जलद मार्गावरील तसेच एलटीटी ते ठाणेदरम्यानच्या पाचवा-सहाव्या मार्गांचे डीसीमधून एसीमध्ये विद्युत रूपांतरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी रविवार, १0 नोव्हेंबरला मध्यरात्री साडेतीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. तसे लेखी पत्रसुद्धा रेल्वे सुरक्षा आयुक्तांना पाठविण्यात आले होते. मात्र सुरक्षा आयुक्तांनी आतापर्यंत ओव्हरहेड वायरमुळे किती प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे, याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडे मागितली होती. अशा प्रकारची माहिती रेल्वे सुरक्षा आयुक्त याआधीही मागवू शकले असते; परंतु नेमके डीसी-एसी कामाच्या वेळेतच हा प्रश्न विचारून आयुक्तांनी नवीन मुद्दा उपस्थित करून कामाला खीळ बसवली असल्याचे मध्य रेल्वेमध्ये बोलले जात होते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या या आक्षेपामुळे ठाणे ते कल्याण एसी कामाला विलंब होत होता. त्यातच भर म्हणून आता हे प्रकरण रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांकडे गेले आहे. ते जयपूरला बसतात, त्यामुळे ते आता कधी परवानगी देतात त्यावर डीसी-एसीचे भविष्य ठरणार आहे.

No comments:
Post a Comment