सफाई कामगारांचा रविवारी मेळावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2013

सफाई कामगारांचा रविवारी मेळावा

14/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) 
मुंबई : जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या मुंबई शाखेतर्फे येत्या रविवारी म्हणजेच १५ डिसेंबरला मालकी हक्काच्या घरांच्या विषयावर सफाई कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

माटुंगा लेबर कॅम्प येथे संध्याकाळी ४ वाजता होणार्‍या या मेळाव्याला मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, महासचिव राजेश तांबे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनील चौहान आदी मान्यवर संबोधित करणार आहेत. मुंबई महापालिकेत जवळपास २0 हजार सफाई कामगार असून, त्यापैकी बर्‍याच जणांना पालिकेने घरे दिली आहेत. मात्र नवृत्तीनंतर स्वत:च्या मुलाला सफाई कामगार म्हणून भरती केले तरच हे घर पुढे त्या कुटुंबाकडे राहते. त्यामुळे दोन-तीन पिढय़ा तेथे राहणार्‍या अनेक सफाई कामगारांवर त्यांची घरे रिकामी करून देण्याची पाळी आली आहे.

याच वेळी खाजगी कंपन्या व आस्थापनांमध्ये काम करणार्‍या सफाई कामगारांना कोणी वालीच नाही. गिरणी कामगारांना, माथाडी कामगारांना सरकार अल्प दरात मालकी हक्काने घर देते. पण या कामगारांवर मात्र अन्याय करत आहे. या पार्श्‍वभूमीवर सफाई कामगारांना मालकी हक्कावर घरे उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS