14/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक सलग तिसर्या दिवशीही विस्कळीतच होती. महत्त्वाचे म्हणजे शुक्रवारी फक्त मेन लाइन मार्गावरीलच नव्हे, तर ट्रॉन्सहार्बर मार्गावरील वाहतूकही खोळंबली होती. मेन लाइनवर कळवा, बदलापूर स्थानकात तर ट्रान्सहार्बर मार्गावर कोपरखैरणे स्थानकात बिघाड झाला होता. सकाळच्या वेळेतच वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवासी वैतागले होते.कळवा, बदलापुरात सिग्नलमध्ये बिघाड कोपरखैरणेत रुळांना तडेशुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कळवा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. सकाळी ८ ते ९ वाजेपर्यंत सिग्नल यंत्रणा विस्कळीत झाली होती. त्यामुळे डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली होती. प्रवाशांच्या सोयीसाठी डाऊन धिम्या मार्गावरील ४ लोकल गाड्या मुलुंड ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात आल्या होत्या. तर डाऊन मार्गावरील ९ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मेन लाइनची डाऊन मार्गावरील वाहतूक सुमारे १0 ते १५ मिनिटे उशिराने धावत होती. तसेच ट्रान्सहार्बर मार्गावरील कोपरखैरणे स्थानकात रेल्वे रुळांना तडे गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रान्सहार्बर मार्गावर कोपरखैरणे स्थानकात वाशी-ठाणे अप मार्गावर सकाळी ७.२५ ते ८.२0 या वेळेत रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यामुळे या मार्गावरील ४ लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. सकाळच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरील स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रवाशांच्या त्रासात भर म्हणून सकाळी १0.४५ च्या सुमारास मेन लाइनच्या बदलापूर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. हा बिघाड सुमारे ११.२0 वाजण्याच्या सुमारास दुरुस्त करण्यात आला, परंतु मेन लाइनच्या लोकल गाड्या संध्याकाळी उशिरापर्यंत १0 ते १५ मिनिटे उशिरानेच धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.


No comments:
Post a Comment