17/1/2014
मुंबई : वित्त विभागाकडून अद्याप निर्णय आला नाही. अशी कारणे देत अंगणवाडी कर्मचार्यांना आश्वासने देत असलेल्या शासनाच्या विरोधात गुरुवारपासून आझाद मैदानात कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. लाखो बालकांचा आहार या आंदोलनामुळे थांबला आहे. तरीही शासन का निर्णय घेत नाही? असा सवाल समितीचे ज्येष्ठ नेते बृजपाल सिंह, शुभा शमीम, एम. ए. पाटील, सुकुमार दामले आदी नेत्यांनी या वेळी केला. ६ जानेवारीपासून हे आंदोलन सुरू आहे. यापुढेही असेच सुरू राहणार आहे. शासनाने त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन वेगळ्या प्रकारे करण्यात येईल, असे सिंह म्हणाले. १५ जानेवारी २0१४च्या मंत्रिमंडळ बैठकीत सेवासमाप्ती एकरकमी लाभाचा निर्णय घेतला नाही. मानधन वाढीचा प्रस्ताव तयार झाला नाही, या व आदी प्रश्नांवर समितीला शासन वेळ देत नाही, असे सिंह म्हणाले.


No comments:
Post a Comment