घाटकोपर स्थानकातील खड्डा बुजवणार! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 January 2014

घाटकोपर स्थानकातील खड्डा बुजवणार!

17/1/2014
मुंबई : गेल्या शनिवारी घाटकोपर येथील प्लॅटफॉर्मवर झालेल्या अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या अपघातानंतर मध्य रेल्वेकडून तिथला खोलगट खड्डा बुजवला जाणार आहे. हा खड्या बुजवण्यात आला तर त्या ठिकाणचा सिग्नल काही अंतरावर स्थलांतरीत करण्याचा मार्ग स्वीकारला जाणार आहे. 

शनिवारी घाटकोपर येथील प्ल्ॅाटफॉर्म क्रमांक दोन वर लोकल पकडण्याच्या घाईत झालेल्या अपघातात मोनिका मोरे हिला आपले दोन्ही हात गमवावे लागले होते. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनावर मोठय़ा प्रमाणात टीका करण्यात आली. त्याचवेळी स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि लोकल गाड्यांमधील जास्त अंतराचा प्रश्नही चर्चेला आला आहे. अशावेळी घाटकोपर येथील प्लॅटफॉर्मवर असणारा खड्डा बुजविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. 

तसेच इथल्या खांबाशी असणारी सिग्नल यंत्रणा बंद करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला आहे. संपूर्ण सिग्नल यंत्रणा बंद करण्याऐवजी सिग्नल अन्यत्र स्थलांतरीत करण्याचा पर्याय रेल्वे प्रशासनाकडून स्वीकारण्यात येऊ शकतो. त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले. उपनगरीय रेल्वेने प्रवास करीत असताना दररोज किमान ८-९ प्रवाशांचा अपघात होतोच. त्यामुळे रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात यावी, अशी मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केली आहे. त्यामध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय साधून निधी उभारायला हवा, असेही शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS