नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली 'एनडीए'चे सरकार स्थापन होईल, असा अंदाज 'एबीपी न्यूज-एसी नेल्सन' यांच्या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, भाजपला २१०, तर कॉंग्रेसला केवळ ८१ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त झाला आहे.
काल (शनिवार) जाहीर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात एनडीएला एकूण २२६, तर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला १०१ जागा मिळाल्या आहेत. डाव्या आघाडीला ३० जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच एनडीए, यूपीए किंवा डाव्या आघाडीचे सदस्य नसलेले पक्ष किंवा अपक्षांना एकूण १८६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा 'आम आदमी पक्ष' देशभरात ११ जागांवर विजय मिळवू शकेल, असाही अंदाज यातून समोर आला आहे.
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून भाजपच्या नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. या सर्वेक्षणानुसार, मोदी यांना ५३ टक्के मतदारांनी पसंतीची पावती दिली आहे, तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना १५ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.


No comments:
Post a Comment