PHOTO - प्रजासत्ताक दिन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 January 2014

PHOTO - प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन: भारताने जगाला दाखविली आपली ताकद

नवी दिल्ली- देशभरात आज (रविवार) 65 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिन्ही दलांच्या सैनिकांनी संचलन करून, देशाची ताकद दाखवून दिली.

राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांनी सकाळी दहा वाजता तिरंगा फडकाविला. राष्ट्रपतींनी यानंतर हुतात्मा प्रसाद बाबू यांना अशोक चक्र वाहिले. नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या कारवाईदरम्यान प्रसाद बाबू हुतात्मा झाले होते. जवानांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर त्यांनी परेडची सलामी स्वीकारली.

प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनात सहभागी होण्यासाठी विविध राज्यांच्या रथांनी सहभाग घेतला होता. ब्रम्होस क्षेपणास्त्राची झलक दाखविण्यात आली. सैनिकांच्या विविध तुकड्यांनी आपल्या कसरती सादर करून, देशाची ताकद दाखवून दिली. जपानचे पंतप्रधान शिंजो अबे हे मुख्य पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. भारताची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतीक व एकजुटीचे दर्शन यावेळी पहायला मिळाले. 
65 वा प्रजासत्ताक दिन: भारताने जगाला दाखविली आपली ताकद65 वा प्रजासत्ताक दिन: भारताने जगाला दाखविली आपली ताकद
65 वा प्रजासत्ताक दिन: भारताने जगाला दाखविली आपली ताकद

मुंबईचे महापौर सुनील प्रभू, उपमहापौर मोहन मीठबावकर आणि पालिका आयुक्त सीताराम कुंटे 
Displaying DSC_0559.JPG

मध्य रेल्वेचे सुनील कुमार सूद 
Displaying 126-GM Flag.jpg

पश्चिम रेल्वेचे हेमन्त कुमार 
Displaying press.JPG

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS