आरे व पालिकेविरोधात अपंगाचे उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 January 2014

आरे व पालिकेविरोधात अपंगाचे उपोषण

मुंबई / प्रतिनिधी 
जोगेश्वरी पूर्व येथे राहणारे संतोष डाकी अर्धांगवायूचा झटका आल्याने गेले १० वर्षे आजारी आहेत. अपंग झाल्याने डाकी यांच्या घरची आर्थिक परिस्तिथी खालावली आहे. रोजगार मिळावा म्हणून डाकी यांनी अंधेरी सीप्झ डेपो येथे शासकीय दूध पुरवठा करणाऱ्या आरेचे केंद्र चालवायला द्यावे यासाठी आरे व पालिकेकडे अर्ज केला होता. डाकी यांना आरेचे केंद्र मिळावे यासाठी आमदार रविंद्र वायकर व नगरसेवक अनंत नर यांनी आरे व पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. डाकी यांना आरेचे केंद्र जिथे आहे ती जागा मुंबई महानगर पालिकेची असून पालिकेने " ना हरकत प्रमाणपत्र " दिल्यास केंद्र मिळू शकते. परंतू पालिकेकडून " ना हरकत प्रमाणपत्र " देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने डाकी यांनी १ फेब्रुवारी पासून मुंबईच्या आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत मुख्यमंत्री, पालिकेचे आयुक्त आरेचे केंद्र दिल्याचे जाहीर करत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे डाकी यांनी सांगितले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS