रशिद इनामदार / प्रतिनिधी
या स्पर्धेत मुंबई उपनगरातील पुरुषांच्या १६ तर महिलांच्या ८ संघांनी भाग घेतला होता . टागोरनगर मित्र मंडळ,विक्रोळी आणि शिवनेरी क्रीडा मंडळ,घाटकोपर या दोन संघांमध्ये महिलांचा अंतिम सामना रंगला या सामन्यात टागोरनगर मित्र मंडळाने विजय मिळवला . पुरुषांचा अंतिम सामना शितलादेवी क्रीडा मंडळ,चेंबूर आणि साहसी कला क्रीडा मंडळ या संघात झाला . अत्यंत अटी तटीच्या रंगतदार सामन्यात साहसी क्रीडा मंडळ विजेता ठरले . या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू साईली फाटक हिला विशेष पारितोषिक देऊन गौरवण्यात आले . प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला होती . या मंडळातर्फे दरवर्षी मैदानी खेळांचे आयोजन करण्यात येते . या स्पर्धांचं हे २४ वे वर्ष आहे . आजवर राजाराम बोऱ्हाडे यांनी ५२ तरुणांना व्यसनमुक्त केले आहे . यावर्षी व्यसनमुक्ती चे कार्य मंडळातर्फे हाती घेण्यात आले आहे . तसेच पुढील वर्षीच्या कबड्डी स्पर्धा मॉट वर खेळवण्याचा मंडळाचा मानस आहे असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले .


No comments:
Post a Comment