मुंबई / अजेयकुमार जाधव
बेस्ट प्रशासनाने दादर पश्चिम येथील कबुतर खाना ते दादर स्मशान भूमी पर्यंत दादर फेरी – २ अशी बस सेवा सुरु केली असून या बसला दादर कबुतरखाना ते स्मशानभूमी असे नाव देण्यात आले आहे. दादर येथे जिथे हि बस सेवा समाप्त होते त्या ठिकाणी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. तरीही या बस सेवेला चैत्यभूमी असे नाव देण्यात आलेले नाही यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये बेस्ट प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
बेस्ट प्रशासनाने दादर पश्चिम येथील कबुतर खाना ते दादर स्मशान भूमी पर्यंत दादर फेरी – २ अशी बस सेवा सुरु केली आहे. या
सोयीकरीता ‘बेस्ट’ उपक्रमाने सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान ही बससेवा सुरु केली आहे.
बस सेवेचा महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते व बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांच्या उपस्तिथी मध्ये २८
जानेवारी २०१४ ला प्रारंभ करण्यात आला आहे.
दादर फेरी – २ असे या बससेवेचे नांव असून दादर स्थानक (पश्चिम) (कबुतरखाना) – वीर
कोतवाल उद्यान – सेनाभवन – सेनापती बापट स्मारक – दादर स्मशानभूमी / चैत्यभूमी असा हा बस
मार्ग आहे.
शिवाजी पार्क येथील हिंदू स्मशानभूमी तसेच चैत्यभूमीस भेट देणाऱया प्रवाशांच्या
शिवसेनेकडून महायुतीची भाषा केली जात असतानां बाबासाहेबांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बेस्ट प्रशासनाने दादर फेरी २ चे नाव दादर कबुतर खाना ते चैत्यभूमी असे करावे यासाठी दिलीप गायकवाड यांनी महापौर, बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले, तसेच बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांना निवेदन दिले आहे. बेस्टने बसचे
चैत्यभूमी असे नाव देण्यास टाळाटाळ केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गायकवाड यांनी दिला आहे.


No comments:
Post a Comment