मुंबई : मस्जिद बंदर रेल्वे स्थानक ते अब्दुल रेहमान स्ट्रीट दरम्यान होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन या दरम्यान लवकरच भुयारी मार्ग तयार करण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल, असे महापौर सुनील प्रभू यांनी पत्रकारांना सांगितले.
मस्जिद बंदर ते अब्दुल रेहमान स्ट्रीटदरम्यान मोठय़ा प्रमाणात होलसेलची दुकाने आहेत. या वस्तू खरेदी करण्यासाठी येथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. तसेच तेथे सर्वधर्मीयांची व धार्मिक स्थळे, रुग्णालये, व्यापारी आस्थापने असून या निमित्त नागरिकांची तेथे नेहमीच वर्दळ असते. परिणामी, याठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. ही बाब लक्षात घेऊन "मुंबई-३ ब्युटिफिकेशन असोसिएशनच्या" सदस्यांनी याठिकाणी भुयारी मार्ग पालिकेने उभारावा, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर असोसीएशनच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले.

No comments:
Post a Comment